मटका बुकीवर धाड

शहरात लोकांकडून पैसे घेऊन आकड्यावर लावून स्वताच्या फायद्यासाठी मिलन नाईट खेळत व खेळवित असताना बुकी चालक इरफान शेख यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करून रोख रकमेसह मुद्देमाल लातूर येथील विशेष पथकाने जप्त केला....

मटका बुकीवर धाड

माधव पिटले / निलंगा : शहरात मटका हा अवैध व्यवसाय छुप्या मार्गाने खेळवला जात होता. याची माहिती लातूर येथील गुन्हे शाखेला समजताच पथकाचे प्रमुख गजानन क्षिरसागर व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांनी शहरात रामकृष्ण नगर, पिरपाशा दर्गाजवळ दादापीर नगर शिवाजी नगर, लांबोटा, सिंदिजवळगा, यासह अनेक ठिकाणी पोलिस आधिक्षक यांच्या विशेष पथकाने मिलन मटका जुगार खेळत व खेळवत असताना धाडी टाकून रोख रक्कम १ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला व शहरातील मुख्य बुकी चालक इरफान शेख, शंभूलिंग निला उर्फ टील्लू,फकीर शेख बाळासाहेब घोलप,सतीश कांबळे,राम आवटे,शेख नजात,बळीराम मुंगळे,खतीब अक्तर,अक्तर फकीर,या आरोपींना रंकेहाथ पकडून निलंगा पोलिस ठाण्यात पोलिस हेड काँस्टेबल डी.एम.गुडमेवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल केले आहेत.

लातूर येथील पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी जिल्ह्यात मटका जूगार अवैध देशी दारू विक्री यावर बंदी आणली होती. परंतु निलंगा शहर व परिसरातील अनेक गावात अवैध धंदे मोठ्या जोमाने चालू होते. त्यात मिलन नावाचा मटक्याच्या नावावर लाखो रूपयांची उलाढाल सुरू होती यामुळे शहरासह तालुक्यातील सुव्यवस्था बिघडली होती. अशी माहिती मिळताच पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने बुकी चालकासह अनेकांवर गुन्हे दाखल केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.