विजय कुलकर्णी/ परभणी : शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मनपा आयुक्तांना मंगळवारी निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या २४ तारखेपासुन संपावर जाण्याचा ईशाराही दिला आहे.
निवेदनात सातवा वेतन आयोगाचा प्रस्ताव शासनास सादर करावा, महापालिकेतील मंजुर आकृतिबंधातील रिक्त पदांवर शैक्षणीक पात्रतेप्रमाणे कर्मचा-यांचे समावेशन त्वरित करावे, नियमित कर्मचा-यांसह सेवानिवृत्तांच्या कर्मचा-यांचे वेतन दरमहा सात तारखेस करण्यात यावे, थकित राहिलेले वेतन त्वरित देण्यात यावे, यासह अन्य मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा २३ फेब्रुवारी रोजी सफाई कामगार व कर्मचारी संघटनेतर्फे एक दिवस धरणे तर २४ फेब्रुवारीपासून सर्व कर्मचारी बेमुदत संप पुकारतील, असे नमुद केले आहे. राज्य नगरपरिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना संलग्नीत परभणी शहर महानगर पालिका सफाई कामगार व कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे, अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, सचिव के.के. भारसाखळे यांनी मंगळवारी आयुक्त देविदास पवार यांना हे निवेदन सादर केले.
२२ फेब्रुवारीपर्यंत सफाई कामगारींच्या मागण्यांबाबत विचार न केल्यास २३ फेब्रुवारीपासून संघटनेचे पदाधिकारी एक दिवस धरणे आंदोलन करतील व २४ फेब्रुवारीपासून कर्मचारी संप पुकारतील, असा इशाराही आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.