माधव पिटले/ निलंगा : संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतीशताब्दी निमीत्त मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार मराठा सेवा संघ प्रणित संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद शाखा निलंग्याच्या वतीने आज विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
संगीत सूर्य केशवराव भोसले हे मराठी आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० मध्ये कोल्हापूरला झाला आणि ४ फेब्रुवारी १९२१ ला मृत्यू झाला. त्यांना अवघ्या ३२ वर्षांचे आयुष्य लाभले. पण या मिळालेल्या अल्प आयुष्यात त्यांनी मराठी रंगभूमीसाठी जे काम केले त्याला जगात तोड नाही. ३२ वर्षांपैकी २८ वर्ष ते मराठी रंगभूमीवर सूर्यासारखे तळपत राहिले. वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. वयाच्या १८ व्या वर्षी ललितकळदर्श या आजही ह्रदयात असलेल्या नाट्य मंडळाची स्थापना केली. हे त्यांचे कार्य समाजासमोर आजपर्यंत आले नव्हते. मराठा सेवा संघांनी संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेची निर्मिती करून मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबवित आहे. केशवराव भोसले हे हाडाचे अभिनेते, गायक, नृत्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, व्यवस्थापक, प्रशासक, कुशल संघटक व प्रयोगशील नाट्यधार्मि अभ्यासू व्यक्तिमत्व होते हे पाहील्यांदा समाजासमोर आणण्याचे काम मराठा सेवा संघांनी केले.
पण या थोर कळावंताची आजपर्यत झालेली उपेक्षा थंबविण्या साठी त्यांच्या आजोड कर्तुत्वाचा परिचय शासनाला करून देण्यासाठी मराठा सेवा संघाने केशवराव भोसले स्मृतीशताब्धी वर्ष साजरे करीत आहे त्या निमित्य ४ फेब्रुवारी २०२१ रोजी एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देत आहे. त्याचाच भाग म्हणून निलंगा मराठा सेवा संघाच्या वतीने तहसीलदार मा. अडसूळ यांना १) सरकारने संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने संगीत क्षेत्रातील कर्तृत्वान कळावंतानां पुरस्कार सुरु करावा २) संगीत नाटक क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दयावी.३) शासकीय स्तरावर केशवराव भोसले यांची जयंती पुण्यतिथी सुरु करावी.४) संगीत सूर्य केशवराव भोसले कला साहित्य सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करावी. अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघांचे संस्थापक सदस्य प्रा.डॉ. धनंजय जाधव, पी. एस. सगरे, डी. एन. बरमदे, मसेसं तालुकाध्यक्ष, प्रा. डॉ. हंसराज भोसले, कार्याध्यक्ष, मोहन घोरपडे,सहकोषाध्यक्ष,डॉ. नितीन चांदुरे,सहसचिव प्रा. विश्वनाथ जाधव, प्रा. श्रीकृष्ण दिवे, सुनील टोम्पे सर,केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद चे प्रमुख अमरजीत पाटील, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा, अर्चनाताई मोरे, सुंदर बोन्डगे ताई, स्नेहा बोळे,पदेराशिपचे अनिल जाधव सर, उद्योजक कक्षा चे कुमोद लोभे, भागवत पवार, गोपाळ भोपी, प्रदीप सोळुंके, वैभव सूर्यवंशी, आदेश बिराजदार आणि संभाजी ब्रिगेड चे प्रमोद कदम इत्यादी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्तित होते.