प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली : महावितरण विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये थकबाकी वीज बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना मुळे ग्रामीण भागातील आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा पार्श्वभूमीवर महावितरणने घरगुती मीटरची थकीत वीजबिल वसुली सक्तीने करू नये असे निवेदन आमदार.तानाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
मुटकुळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलली आहे. त्यामुळे नागरिक आधीच आर्थिक संकटात असताना महावितरणच्या वतीने सक्तीने वीज बसून वीज बिल वसुली केल्या जात आहे. या संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. याचा विचार करून शक्तीने विज बिल करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने थकित वीज बिल घेण्यात यावे. जेणेकरून नागरिकांना देखील याचा त्रास होणार नाही. अशी विनंती मुटकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.