रस्त्यांची चाळण थांबवा..!

नळ कनेक्शन देण्याच्या नावाखाली शहरातील रस्त्यांची चाळण थांबवा - प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी...

रस्त्यांची चाळण थांबवा..!

विजय कुलकर्णी/परभणी : शहरामध्ये नव्याने होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे नळ कनेक्शन देण्याच्या नावाखाली शहरातील रस्त्यांची चाळणी होत आहे. मागील ६-८ महिन्याखाली नव्याने करण्यात आलेले रस्ते मनमानी पध्दतीने अनेक जागी फोडण्यात आले आहेत. याबाबत परभणी शहर महानगरपालिकेतील समन्वयाचा अभाव दिसुन येत आहे. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधने व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना निवेदन दिले आहे.

शहरातील विद्यानगर, नाथनगर व नांदखेडा रोड परिसरात मागील ६-८ महिन्यापूर्वी नव्याने झालेले डांबरीकरणाचे रस्ते नळ कनेक्शनच्या नावाखाली मनमानी पध्दतीने फोडण्यात आले आहेत. दोन नळ कनेक्शनमध्ये १ ते २ फुटाचे अंतर असताना एकाच खड्ड्यातुन दोन्ही नळ कनेक्शन घेणे सहज शक्य आहे. तरी वेगवेगळे खड्डे केले आहेत. याकडे मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानीपणा दिसुन येत आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांची हीच अवस्था आहे. नांदखेडा रस्त्यावर ५५ फुटाच्या अंतरात एकुण ५ वेगवेगळे खड्डे करुन नळ कलेक्शन दिले आहेत. १५ फुटामध्ये ५ वेगवेगळे खड्डे करण्याऐवजी एकाच खड्ड्यातुन ५ नळ कनेक्शन देता आले असते. परंतु मनपा पाणीपुरवठा विभाग मनमानी कारभार करत आहे. यामुळे शहरातील रस्ते वाचवावे अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनाच्या प्रती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री बच्चू कडू, व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, नारायण ढगे, पिंटू कदम, ज्ञानेश्वर पंढरकर, दत्तराव रोंदळे, बाळू नरवाडे, सखाराम पावडे, इरफान बेग व सचिन गिरी आदींच्या स्वाक्षरी आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.