नागपुरमध्ये कडक निर्बंध लागू

आठवडी बाजार ७ मार्चपर्यंत बंद...

नागपुरमध्ये कडक निर्बंध लागू

नागपुर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागपुरमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याच्या सुचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी केल्या आहेत. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभुमीवर एक महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर पालकमंत्री नितिन राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नागपुरात कोणते असणार निर्बंध

  • आठवडी बाजार ७ मार्चपर्यंत बंद

  • मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद राहणार.

  • ७ मार्च पर्यंत सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील.

  • हॉटेल, रेस्टोरेंट ५० टक्के क्षमतेने चालतील, रात्री ९ नंतर हॉटेल बंद केले जातील.

  • सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम ७ मार्चपर्यंत बंद राहतील. मंगल कार्यालय २५ फेब्रुवारी नंतर ७ मार्च पर्यंत बंद राहणार. त्यामुळे ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल.

  • मंगल कार्यालयांमध्ये ७ मार्चपर्यंत लग्न होणार नाही.

  • बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरू करणार, आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार

  • नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.