एम.एस.हुलसूरकर/ हुलसूर : कर्नाटक राज्याचे कृषी मंत्री. बी.सी.पाटील यांनी शेतकर-या
सोबत एक दिवशीय संवाद साधला आहे.शेतकर-्याच्या अनेक समस्या असातात त्या निवेदनाद्वारे मिळतात. पण आता कर्नाटक सरकारने शेतकरासाठी अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने एक दिवस त्यांच्या सोबत राहुन शेतकर-्याच्या समस्या सोडविण्याचा निर्णय घेतल्याने समाधान मंत्री पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, मी एक शेतकर्-याचा मुलगा आहे. शेतकर-याचं अतिवृष्टी मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारने २३६ कोटी देण्यात येणार आहे. तसेच आणखी निधी देऊ असे ते यावेळी म्हणाले. शेतकारी वर्गाने जास्त प्रमाणात ऊस लागवडीसाठी पुढे यावे. त्याचबरोबर जिह्यातील सर्व कारखाने सोबत बोलणं झालं आहे. ऊसासाठी प्रति टन २४०० रु देण्याचे त्यांनी जाहीर केले.
बिदर जिल्हा पालकमंत्री प्रभू चव्हाण कर्नाटक सरकारने गो हत्या कायदा आणला आहे.जनावरे आजारी पडले त्यासाठी अँम्बोलन्सची सेवा सुरु करण्यात आली असल्याच यावेळी सांगण्यात आले
यावेळी खा. भगवंत खुबा, माजी आ. मल्लिकार्जुन खुबा, भाजपचे नेते सुर्यकांत नागमारपल्ली, जि.पं.सदस्य गुंडू रेड्डी, ता पं अध्यक्ष सिद्रामअप्पा कामणा, उपाध्यक्ष शांतम्मा पांचाळ, जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन स्वामी, ता.पं.सदस्य गोविंदराव सोमवंशी, नागनाथ हलींगे, नागाप्पा नजवाडे, गुरुनाथ वड्डे यासह आदीची उपस्थित होती.: