विजय कुलकर्णी/परभणी : जिंतूर तालुक्यातील सोस येथील एका १९ वर्षीय तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली.
जिंतूर तालुक्यातील सोस येथील शिवशंकर संपत शिंदे (१९) हा मागील काही दिवसांपासून मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत असे मात्र काही दिवसांपासून अस्वस्थ राहत होता. काल सकाळी गावातील शेतात काम करण्यास गेलेल्या महिलांना मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला होता. यावेळी ग्रामस्थांनी चारठाणा पोलिसांना माहिती दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक अलापूरकर व बिट जमादार गाढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी शव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉ. अनिब खान गंगाधर पालवे यांनी उत्तरीय तपासणी केली आहे.