सुमित दंडुके / औरंगाबाद : शहरातील हनुमाननगर गल्ली.नं.२ येथील रहिवासी जगदीश पोपटराव देशमुख (वय.३५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि.१७ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
जगदीश यांनी त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील छताला दोरीने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनावणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवुन घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.
कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहे.