तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

कर्ज व नापिकीला कंटाळून तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

माधव पिटले/औसा:औसा तालुक्यातील चिंचोली सोन येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

चिंचोली सोन येथील तरूण शेतकरी नागनाथ भानुदास सरतापे वय ४० वर्षे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरील शेतकऱ्याला ८ एकर जमीन आहे.त्यावर अनेक बँकेचे कर्ज काढले आहे. तसेच सततची नापिकी, कर्ज याला कंटाळून या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा अर्ज भादा पोलिसांत दिला असून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पश्चात आई,वडील पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास भादा पोलिस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.