गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

याबाबत ताडकळस पोलीस ठाण्यात विठ्ठल ज्ञानोबा बंडगर यांनी फिर्याद दिली आहे...

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

विजय कुलकर्णी/ ताडकळस : पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलकळस येथील एका युवकाने शेतातील आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत ताडकळस पोलीस ठाण्यात विठ्ठल ज्ञानोबा बंडगर यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजी तुळशीराम बंडगर (वय १९) याने शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास फुलकळस शिवारातील शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत मुळे, कर्मचारी वसीम काजी, बाबासाहेब रोडे आदी पोलिस कर्मचारी दाखल झाले. याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.