प्लास्टिकचे ध्वज विकणा-यांवर कारवाई करा

प्लास्टिकच्या राष्ट्रीय ध्वजाच्या विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी हिंदू जनजागरण समितीने केली.

प्लास्टिकचे ध्वज विकणा-यांवर कारवाई करा

विजय कुलकर्णी/परभणीः २६ जानेवारी प्रजाकसत्ताक दिनाच्या निमीत्ताने बाजारात प्लास्टिकचे ध्वज विक्रीकरीता येतात. मात्र या प्लास्टिक ध्वजाच्या विक्रीवर बंदी आणावी व विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागरण समितीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे केली आहे.

प्रजासत्ताक दिन नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. पण राष्ट्रध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा आकार कसा असावा, कुठे फडकला जावा, याबाबत संहिता आहेत. त्याचे नागरिक नकळत उल्लंघन करतात. असे झाल्याने राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होतो. जसे की लोक उत्साहात प्लस्टिकचे छोट्या आकाराचे ध्वज त्यादिवशी वापरतात व दुस-या दिवशी हेच ध्वज रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी आढळतात.

प्लास्टिक असल्याने ते लवकर नष्ट देखील होत नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. मुंबई उच्च न्यायालयाने देखील ह्याबाबत शासनास आदेशही दिले आहेत. त्यानुसार राष्ट्रध्वज अवमान रोखण्यासाठी शासनाने परिपत्रक देखील काढले. त्यानुसार सध्या प्लास्टिक ध्वज व ऑनलाइन वर तिरंगा असलेले मास्क पण विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे दिसत आहे. शासनाने यावर कठोर कारवाई करून या प्रकारचा होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली. निवेदनावर श्रीनिवास दिवाण, संदीप देशमुख, महेश स्वामी, धंनजय जोशी, मंदार कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.