प्रलंबित प्रश्नांसाठी तालुका विकास कृती समिती गठीत

विकाससाठी सरसारवले सेलुकर

प्रलंबित प्रश्नांसाठी तालुका विकास कृती समिती गठीत

विजय कुलकर्णी/ परभणी : मागील अनेक वर्षापासून महत्वाचे प्रकल्प प्रलंबित असून सदर कामे मार्गी लावण्यासाठी सेलु शहरासह तालुक्यातील सुजाण नागरिक सरसावले आहेत. सर्वसामान्य नागरीकांनी शासनास जाब विचारण्यासाठी सेलू तालुका विकास कृती समितीचे गठण केले आहे.

स्वामी रामानंद तिर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयात नागरिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बैठकीस नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, त्र्यंबकराव बोराडे, डी.व्हि. मुळे, रामकृष्ण शेरे, नंदकिशोर बाहेती, जयप्रकाश बिहाणी, मिलिंद सावंत, दत्तराव आंधळे, मजिद बागवान, सदाशिव निकम, विलास रोडगे, डाँ. अरविंद बोराडे, विनोद तरटे, दत्तराव मगर, रहिम पठाण, डाँ. रुतुराज साडेगावकर, सुभाष चव्हाण, सर्जेराव लहाने आदींनी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून नागरीकांनी पुढाकार घेवुन हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनास भाग पाडावे लागणार आहे.

तालुक्यात लोअर दुधना प्रकल्पातील चार्यांची कामे तसेच डावा व उजवा कालव्यावरील मायनर कामे, प्रमुख महामार्ग रस्ते, १३२ केव्ही उपकेंद्र, औद्योगीक वसाहत, रेल्वे उड्डाण पूल, बस डेपो, मोरेगाव दुधना नदीवरील पुल, उपजिल्हा रुग्णालय वाढीव खाटासह नेत्र शस्रक्रिया, जि.प. शाळांच्या वर्गखोल्यांची दयनीय अवस्था आदी प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. प्रमुख प्रश्न १३२ के.व्ही. उपकेंद्र मंजूर होवूनही ईतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. तर औद्योगीक वसाहतीचे सुद्धा अशाच प्रकारे स्थलांतर करण्यात आले. तर शहरास जोडणार्या प्रमुख महामार्गांची अवस्था नाजूक आहे. असे अनेक प्रश्न तालुक्याच्या विकासास कोसो दुर नेत आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व नागरीकांनी एकत्र येणे गरजेचे असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा या तालुका विकास कृती समितीची असून ही समिती प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच गठीत केली असल्याचे सांगितले जात आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.