राज्य : दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता ऑफलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड सध्या अनुकूल नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून दहावी बारावीच्या परीक्षांचा शालेय शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.
कोरोना झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात संसर्ग जास्त प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा घायच्या यासाठी शालेय शिक्षण विभागाने परीक्षांसंदर्भात आढावा घेतला होता. यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्याचा पर्याय असू शकतो का? परीक्षा ऑनलाईन घेता येतील का? अशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी शिक्षण विभागाने सांगितले की, दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. ऑनलाईन परीक्षा घेतली, तर ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे जर परीक्षा घ्यायची असेल तर ती ऑफलाईनच झाली पाहिजे. परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार अशी त्यांनी भूमिका घेतली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात अद्यापही कोणतेही बदल झाले नाही. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून त्यानंतरच तारखांसंदर्भातील निर्णय घेतले जातील. परंतु परीक्षा या ऑफलाईनच झाल्या पाहिजेत, अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे.