पुणे: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सीरम इंस्टिट्यूटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीचा लस निर्मितीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.

पुण्यातील हडपसर जवळील गोपाळ पट्टीत असणाऱ्या सीरमच्या प्लँटमधील नवीन इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलास दुपारी अडीच वाजता आगीची घटना समजली आणि तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, अगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.