अपघात विभागाला लागली अचानक आग

जिल्हाधिका-यानी केली चौकशी समिती गठित, तीन दिवसात अहवाल देण्याचे आदेश

अपघात विभागाला लागली अचानक आग

विजय कुलकर्णी/ परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या वरच्या मजल्यावरील जिन्यात ठेवलेल्या साहित्यास काल रात्री उशीरा आग लागली. यात बरेच साहित्य जळून खाक झाल्याचे दिसत आहे.अचानक लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशी समिती गठित केली आहे. या समितीने चौकशी अहवाल तीन दिवसात सादर करावा, असे आदेश हि जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या वरील मजल्यावर ठेवलेल्या लाकडी सामानास काल रात्री १० वाजता अचानक आग लागली. या आगीमुळे दवाखान्यात मोठा हल्लकल्लोळ उडाला. यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले. अचानक लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके, मनपा उपायुक्त गायकवाड यांची सदस्य म्हणून तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनासह इतर रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विविध विभागात उपचार करण्यात येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये, म्हणून आगीच्या घटनेच्या कारणांची चौकशी करण्यासाठी ही समित गठित करण्यात आली असून पुढील तीन दिवसात चौकशी अहवाल सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.