पोलीसांच्या गाडीतून आरोपी पळाला

पोलीसांच्या हाताला झटका देत पळून गेला आरोपी...

पोलीसांच्या गाडीतून आरोपी पळाला

सुमित दंडुके / औरंगाबाद : पोलीस वाहनात बसलेला आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देत पळून गेल्याची खळबळजनक घटना आज दुपारी १२:४० वाजता मुकुंदवाडी पोलीस ठाण्यासमोर घडली.

अमर भाऊसाहेब गायकवाड (वय.२१, रा.जाधववाडी) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी अमर विरूद्ध मारहाण करून लुटल्याचा गुन्हा मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी काल रात्री अमरला अटक केली होती. आज त्याला पोलिसांच्या वाहनाने न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीसांनी वाहनात बसविले.
अमरने हतकडी फिट झाल्यामुळे टोचत असल्याचे पोलिसांना सांगितले, यामुळे पोलीस त्याच्या हातातील हतकडी काढून दुसऱ्या हातात लावत होते. याचदरम्यान अमर पोलिसांच्या हाताला झटका देत पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला पण तो काही पोलिसांच्या हाती लागला नाही. याविषयी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.