आयुक्तांच्या तंबीनंतर प्रशासन हलले

मनपा कर्मचाऱ्यांनी सुरु केला विनामास्क दंड

आयुक्तांच्या तंबीनंतर प्रशासन हलले

परभणी : कोविड १९ साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकार्यांना तंबी दिल्यानंतर आता जिल्हा प्रशासन खडबडुन जागे झाले आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास परभणी शहरात मनपा कर्मचारी विनामास्क वाहनचालकांवर कारवाई करताना दिसुन येत आहेत.

कोविड-१९ ची दुसरी लाट जाणवु लागली आहे. अर्ध्या विदर्भात सध्या संचारबंदी लागली आहे. परभणी जिल्ह्यातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. बुधवार एकुण २७ रुग्ण आढळुन आले आहेत. याची खबरदारी घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. ती आॕडीओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. यात कडक शब्दात विभागीय आयुक्तांनी कानऊघडणी केली आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास परभणी शहरातील वसंतराव पुतळ्याजवळ मनपा कर्मचारी ऊभे होते. यावेळी अनेक विनामास्क दुचाकी चालकांवर या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. अनेकांना दंडही ठोठावला आहे. तसेच मनपाच्या वतीने मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेसनाही कोविड-१९ चे नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेले दिसुन येत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.