अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जोसेफ बाइडेन ज्युनियर तसेच ४९व्या उपाध्यक्षा म्हणून कमला देवी हॅरिस यांनी पदांची शपथ घेतली. या शपथविधीनंतर अवघ्या काही तासांताच बाइडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक महत्वपूर्ण निर्णय रद्द केला आहे.
राष्ट्राध्यक्ष बाइडेन यांनी बुधवारी अमेरिकेला पॅरिस हवामान बदल विषयक करारामध्ये पुन्हा सहभागी करुन घेण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कराराच्या माध्यमातून अमेरिका हवामानासंदर्भातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांना तोंड देणार असून आधी हे आम्ही कधीही केलेले नाही, असे बाइडेन यांचे म्हणणे होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही या करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१७ मधून या करारामधून माघार घेतल्याच्या घटनेला ५ नोव्हेंबर २०२० रोजी तीन वर्ष पूर्ण झाली “आजच्याच दिवशी ट्रम्प यांच्या सरकारने पॅरिस करारामधून माघार घेतली होती.