देशाच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प-आ.मेघना बोर्डीकर

महाराष्ट्र पायाभूत सुविधा गतिशल होणार

देशाच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प-आ.मेघना बोर्डीकर

विजय कुलकर्णी / परभणी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१ चा प्रथमच स्वदेशी टॅब वरून सादर केलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्रासह देशाच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प असल्याचे मत जिंतूर-सेलू मतदारसंघाच्या आ. मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केले. या अर्थसंकल्पात विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यासह शेती व पायाभूत सुविधेवर भक्कमपणे विशेष भर दिलेला आहे.

प्रथमच आरोग्याकडे विशेष लक्ष देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्यासाठी २,२३,८४६ कोटींची भक्कम तरतूद केली असून ज्यात ३५ हजार कोटी कोरोना लसीकरणासाठी तरतूद आहे. अपारंपरिक ऊर्जा व विकासासाठी १५०० कोटी रु, जलजीवन मिशन साठी २,८७,००० कोटी रु शिष्यवृत्ती साठी ३५,२१९ कोटी रु रस्ते विकासासाठी १,१८,१०१ कोटी रु,रेल्वे विकासासाठी १,१०,०५५ कोटी रु,हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी २,२१७ कोटी रु, आवश्यक अश्या डिजिटल जनगणनेसाठी ३,७६८ कोटी रु, सौर व ऊर्जा मंडळ विकासासाठी १००० कोटी रु अश्या अनेकविध आवश्यक अश्या महत्वाच्या आर्थिक तरतुदी या अर्थसंकल्पात केल्याने देशात सर्वसामन्यात एक आनंदाची लहर निर्माण झाल्याचे मत सुद्धा आ.मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केले.

या वर्षीच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पामुळे आवश्यक अश्या सोन्या चांदीतील शुल्क कपात ही फायद्याची ठरणार असून सोने चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. ते भाव शुल्क कपातीमुळे स्वस्त होणार यासह रंग, स्टीलची भांडी, कृषी उपकरणे, तांबे लोखंड यासह जीवनावश्यक वस्तूचे भाव स्वस्त होणार असल्याने सर्वसामन्यांना नक्कीच दिलासादायक बाब आहे. पेंशन मधून मिळणारे उत्पन्न भविष्यात करमुक्त होणार असून जेष्ठ अश्या ७५ वर्षा वरील नागरिकांना आयकरात सूट भेटणार आहे. विशेष बाब म्हणजे पेट्रोल,डिझेल वरील कृषी उपकाराचा भार हा ग्राहकांना बसणार नाही ही निश्चितच या अर्थसंकल्पाची दिलासा देणारी बाब आहे असेही त्या म्हणाल्या.

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प

देशात आजवर पहिलाच असा सादर झालेला अर्थसंकल्प आहे, जो पायाभूत गरजांच्या प्रगतीला सर्वाधिक गती देणारा असून बांधकाम क्षेत्रासाठी अत्यावश्यक अश्या पोलाद व सिमेंट क्षेत्राला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रास चालणा भेटल्यामुळे याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीवर होऊन निश्चितच रोजगार निंर्मिती वाढणार आहे.

राज्याला ४२ हजार कोटीची भरीव मदत

या अर्थसंकल्पात राज्याला भरीव अशी ४२ हजार कोटींची मदत केल्याने राज्यातील रेल्वे, मेट्रो, रेल्वे मालवाहतुकीसाठी व पायाभूत प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो-२ च्या घोषणे सह नाशिकसाठी २,०,९२ कोटी रु तर नागपूर साठी 5,976 कोटी रु ची मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे.

कोकण- मुबंईच्या दृष्टीने कोकण रेल्वेच्या धर्तीवर भारतमाता प्रकल्पाची घोषणा करून यावर ६४ हजार कोटींची भक्कम आर्थिक तरतूद केली असून हा नवा मार्ग ११०० किमी चा एकत्र येणार असल्याने कोकण रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प हा ७४१ किमी असून मुबंई ते कन्याकुमारी महामार्ग आपल्या महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या राज्यांना जोडल्या जात असल्याने राज्याची देशातील अन्य राज्यासह दळणवळणाची मजबूत साखळी जोडल्या जात असल्याने भविष्यात व्यापार दळणवळण वाढणार असल्याने राज्याच्या आर्थिक प्रगतीला चालणा मिळणार आहे असे मत आ.मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.