मध्यप्रदेश मध्ये बसचा भिषण अपघात झाला आहे. तब्बल ५४ प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळल्याने ३० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ७ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले असून अधिकाऱ्यांना बचाव कार्य आणि मदत करण्याबाबत आदेश दिले आहेत.
सिद्धी येथून सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. बस कालव्यात पडल्यानंतर बस बुडायला लागली. तेव्हा ७ प्रवाशांनी बसच्या बाहेर पडण्यात यश आले. हे प्रवाशी पोहत कालव्याच्या बाहेर पडले. मात्र उर्वरित ४७ प्रवासी बसमध्ये अडकुन पडले. यापौकी ४ जनाची मृतदेह सापडले. या बसमधील ३९ प्रवाशांनी तिकीट बुक केले होते. यानंतर रस्त्यात आणखी काही प्रवाशी बसमध्ये बसले,अशी माहिती आहे.