पुलावरून पाण्यात कोसळली कार

राहटीच्या पुलावरून मध्यरात्रीच्या सुमारास टायर फुटून कार पुलावरून उलटली

पुलावरून पाण्यात कोसळली कार

विजय कुलकर्णी/ परभणी : राष्ट्रीय महामार्ग परभणी-वसमत स्त्यावरील राहटीच्या पुलावरून काल मध्यरात्रीच्या सुमारास टायर फुटून कार पुलावरून उलटली. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून गाडीत असलेले दोघे बचावले आहेत.

परभणी-वसमत हा राष्ट्रीय महामार्ग असला तरी या रस्त्याची मोठीच दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या परभणी शहराच्या चारही बाजुंच्या रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास गाडी क्रं. एम.एच.४९ डी ८८४६ ही गाडी पुलावरून सुमारे १० फुट खोल पाण्यात पडली. आज सकाळच्या सुमारास या मार्गावरून ये-जा करणार्‍या परिसरातील नागरिकांनी ही गाडी पाहिली. आजुबाजूच्या गावातील अनेक नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी ही गाडी बाहेर काढली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नाही. परंतु राहटीचा पुल हा नेहमीसाठीच धोक्याचा बनत चालला आहे. आधिच या रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. त्यात या पुलावरील कठडेही बहुतांशवेळा तकलादू किंवा गायबच असतात. रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांचा उजेड डोळ्यावर आल्यानंतर वाहनचालक संभ्रमित होतो. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.