या शहराने गाठला पेट्रोल दराचा उच्चांक...

शंभरीच्या जवळ गेले पेट्रोलचे दर...

या शहराने गाठला पेट्रोल दराचा उच्चांक...

विजय कुलकर्णी/ परभणी : भारतामध्ये सर्वात जास्त पेट्रोलचे दर सध्या परभणीत पहायला मिळत आहेत. हे दर सध्या शंभरीच्या जवळपास पोहोचले आहेत. यामुळे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय लोक मात्र पुरते हैराण झाले आहे.

आज शहरात पेट्रोलचा दर ९६ रुपये ९२ पैसे व पॉवर पेट्रोलचा दर ९९ रुपये २७ पैसे प्रती लिटर इतका दर होता. परभणीत पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. विशेषतः अर्थसंकल्पानंतर पेट्रोलच्या दरात दररोजच वाढ होत आहे. याचा मोठा फटका मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात पेट्रोल व डिझेलसाठी परभणीकरांना सर्वाधिक पैसे मोजावे लागत आहेत.

त्याची कारणेही स्पष्ट आहेत. शहरासह जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या पेट्रोलपंप चालकांना मनमाड, सोलापूर, वर्धा व नागपूर येथील डेपोंमधून इंधन टँकरव्दारे आणावे लागते. त्याकरिता वाहतुकीवर जादा पैसे मोजावे लागतात. त्या गोष्टीचा भुर्दंड मात्र, सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला फटका बसु लागला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीत पेट्रोलचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून आले. साधे पेट्रोल व पॉवर पेट्रोलमध्ये जवळपास अडीच रुपयांचा फरक आहे. मात्र, साधे पेट्रोलही ९६ रुपये ९२ पैसे इतके झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.