गाव स्वच्छतेत संत संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे

ग्रामीण भागातील संत संप्रदायाचे योगदानही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे

गाव स्वच्छतेत संत संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे

विजय कुलकर्णी/परभणी : गावे स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त होण्यासाठी ग्रामीण भागातील संत संप्रदायाचे योगदानही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. आज तालुक्यातील ब्राह्मणगाव या ग्रामपंचायतीमध्ये पल्स पोलिओ आणि स्वच्छता संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी.शिवानंद टाकसाळे यांनी भेट दिली.

यावेळी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, गटविकास अधिकारी अनुप पाटील, जि. प. सदस्य जनार्दन सोनवणे, विस्तार अधिकारी जी. एम. गोरे, ए. पी. जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जुनेद, डॉ. यादव, एम. आर. वाघमारे, शब्बीर खान ग्राम विकास अधिकारी अंगद दुधाटे यांच्यासह स्वच्छ भारत मिशन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांनी शाळा, अंगणवाडीची पाहणी केली. वृक्षारोपण आणि प्लास्टिक मोहीम राबवुन गावातील नागरिकांशी संवाद साधला. टाकसाळे म्हणाले, गावामध्ये धार्मिक दृष्टीने लोक बांधील असतात त्यामुळे स्वच्छतेच्या कार्यात संतांनी योगदान दिले तर खेडी-पाडी निर्मल होण्यासाठी नक्की मदत होऊ शकेल. गावातील उघड्यावरची हागणदारी आणि प्लास्टिकचा अति वापर तसेच गावातील रस्ते, नाल्यांची अस्वच्छता यामुळे डेंग्यू, हत्तीरोग, मलेरिया, चिकनगुण्या, टाइफाइड, कॉलरा या सारखे भयंकर रोग बळावत आहेत. उघड्यावरच्या हागणदारीमुळे जनावरांना संसर्गजन्य आजार उद्भवत आहेत, युवकांचे आरोग्यमान ढासळत आहे. ही परिस्थिती खूप भयानक आहे. त्यामुळे आपण वेळीच जागरूक होणे गरजेचे आहे.यासाठी प्रत्येक गावातील युवक मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपसातील मतभेद विसरून संघटित होऊन गाव स्वच्छतेसाठी आठवड्यातून एक तास श्रमदान करण्याचे आवाहनही केले आहे. तसेच यापुढे जे नागरिक समज देऊनही उघड्यावर शौचास जातील त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.