डॉक्टर सापडले नर्स प्रियसी सोबत मग गावकऱ्यांनी....

पत्नीने परिचारिका व पतीस नको त्या अवस्थेत रंगेबदन पकडले

डॉक्टर सापडले नर्स प्रियसी सोबत मग गावकऱ्यांनी....

विजय कुलकर्णी/परभणी: पत्नी घरी नसल्याची नामी संधी साधत जिंतूर तालुक्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍याने अन्य तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करणार्‍या आपल्या  प्रेमिकेला भेटण्यासाठी बोलावले. दोघेही एकत्र असल्याची माहिती त्याच्या पत्नीला समजली
पत्नीने  वडील व भावासोबत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून परिचारिका व पतीस नको त्या अवस्थेत रंगेबदन पकडले.
पत्नीचा राग एवढा होता की तिने थेट पोलिसांना बोलावले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना ३१ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील शासकीय निवासस्थानात घडली. याबाबत वैद्यकीय अधिकार्‍याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकार्‍यांसह परिचारिका, आई-वडील भाऊ-बहीण या ६ जणांविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, तिचे डॉक्टर सोबत ६ मार्च २०१७ रोजी परभणी येथे विवाह झाला होता. लग्नानंतर नवरा सासरा आणि अन्य मंडळींनी संगनमत करून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.  गाडी घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण केली. ही बाब विवाहितेने आई-वडिलांना सांगितल्यानंतर तिच्या आईवडिलांनी  रक्कम देऊन छळ थांबविण्याची विनंती केली. दरम्यान, जानेवारी-२०१९ ते ऑगस्ट-२०२० मध्ये  अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना कंत्राटी परिचारिका म्हणून काम करणाऱ्या महिलेसोबत त्यांचे प्रेम संबंध झाले. याची वाच्यता सगळीकडे  झाल्यानंतर या परिचरिकेने  हिने डॉक्टर कडून  १५ लाख रुपये घेऊन या नंतर मी संबंध ठेवणार नाही म्हणून लिहून दिले होते.
डॉक्टरची पत्नी २७ जानेवारी २०२१ रोजी तब्येत बरोबर नसल्याने तिचे आई-वडील तिला दवाखान्यात दाखविण्यासाठी औरंगाबाद येथे घेऊन गेले. बायको नसल्याची संधी साधत डॉक्टरनी वैद्यकीय अधिकार्‍याच्या निवासस्थानी बोलावून घेतले. ही  माहिती विवाहितेला मिळाली. त्यावरून ती ३१ जानेवारी रोजी रात्री वडील व भावा सोबत ती तेथे हजर झाली. यावेळी घर आतून बंद दिसल्याने तिचा भाऊ घराच्या छतावरून घरात उतरला. यावेळी हे दोघे नको त्या अवस्थेत घरात आढळून आले. याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.