विहीरीत पडला बिबट्या

वनविभागाचे पथक दाखल

विहीरीत पडला बिबट्या

विजय कुलकर्णी/परभणीः जिंतुर तालुक्यातील चारठाणा गावापासुन जवळच असलेल्या वाघी धानोरा ते वडी शिवारातील एका पोलीस पाटलाच्या शेतातील विहीरीत बिबट्याचे पिल्लू दि.१९ रोजी सांयकाळच्या सुमारास पाय घसरून पडले.

याबाबत माहिती अशी की, वडी येथील पोलीस पाटील संजय पवार यांच्या शेतात पाण्याच्या शोधात एक बिबट्याचे पिल्लू आले असता अचानक पाय घसरून विहिरीत पडले. ही बाब आजूबाजूच्या शेतकर्‍यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर शेतकर्‍यांनी फोनवरून गावात ही माहिती कळवली. त्यानंतर पोलीस पाटील संजय पवार यांनी बामणी पोलीस ठाणे व वनखात्याला ही माहिती कळवली.
परंतु वनाधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी तात्काळ येण्यास असमर्थता दर्शविली. या बिबट्याला पाहण्यासाठी गावातील नागरिकांची तोबा गर्दी जमा झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत एकही कर्मचारी अधिकारी घटनास्थळी आले नव्हते. परंतु रात्री उशिरा वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले. दरम्यान, जिंतुर तालुक्यातील अनेक ठिकाणी डोंगराळ भाग आहे. या परिसरात अनेकवेळा वन्य प्राणी आढळून येतात. अशावेळी नागरिकांनी जरी वनविभागाला माहिती दिली तरीही वनविभागातील कर्मचारी आणि अधिकारी कधीही वेळेवर पोहचत नाहीत. गेल्या काही दिवसात असे प्रकार वारंवार घडत आहेत. याकडे वनविभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

वनविभागाचे पथक सायंकाळी दाखल

बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडल्यानंतर आजुबाजूला नागरिकांची गर्दी झाली. सुमारे ५ ते ७ तासानंतर वन परिक्षेत्र अधिकारी जे.डी. कच्छवे, अमोल काशीकर, के.एस. भंडारी, वनपाल व्ही.पी. देवकते वन विभागाचे २० कर्मचार्‍यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. बिबट्याच्या पिल्लाला बाहेर काढण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.