सुरेश शिंदे/ परतूर: आयोध्यातील राम मंदिर निर्माण अभियानात विविध स्तरातून देणगी येत असताना लहान मुले आपले बचतीचे पैसे राम मंदिर निर्माणासाठी देत आहेत. तर दुसरीकडे रिक्षावाले हातगाडीवाले तर काही ठिकाणी चक्क भिकाऱ्यांनी आपल्या भीक मागितलेल्या पैशातून या अभियानात देणगी दिलेली आहे. अशाच प्रकारे तालुक्यातील पाटोदा येथील अत्यंत वृद्धावस्थेत जमेल असे काम करून, आपला उदरनिर्वाह भागविणाऱ्या व मोल-मजुरीतुन बचत केलेले एका वृध्द मातेने जमवलेले ५००/रु. राम मंदिर निर्माण कार्यास सर्मपण केले. वृध्द माउली चे नाव सीताबाई तुकाराम झाटे असून त्या पाटोदा (माव) येथील रहिवासी आहेत.पती व दोन मुले अवेळी स्वर्गवासी झाले . म्हातारपणी एकटे राहून कष्ट करून पोट भरत असतांना हि प्रभू श्रीरामावरची श्रद्धा तुसभरही कमी झाली नाही. रामाचा वनवास संपला आता त्याचे घर रुपी मंदिर माझ्या जिवंतपणी पाहायला मिळेल, व माझेही कणभर योगदान यात राहील हे माझे भाग्य आहे असे गहिवरलेल्या सीताबाई यांनी सांगितले. त्यांचे हे योगदान कोटींपेक्षा मोठे असून अमूल्य आहे व इतरांना प्रेरणा देणारे आहे. असे यावेळी संकलक सुभाष अॅभूरे यांनी सांगितले, या वेळी सुरेश पाटोदकर, योगेश दहिवाल, विठ्ठल कुलकर्णी सह अनेक रामसेवक उपस्थित होते.
मोलमजुरीतून वाचवलेले पैसे वृद्ध आजीने दिले राममंदिरासाठी
वृद्ध अवस्थेत जमेल ते काम करून जमवले पैसे

Loading...