बंद प्रसाधनगृहा अभावी महिला प्रवाशांची कुचंबना

प्रसाधनगृह तात्काळ सुरू करण्यात यावे

बंद प्रसाधनगृहा अभावी महिला प्रवाशांची कुचंबना

परभणी : दक्षिण-मध्य रेल्वेच्या वतीने मागील एक वर्षापासून कोव्हिड-१९ च्या विषाणूमुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या; परंतु मागील डिसेंबर महिन्यापासून काही रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. रेल्वे गाड्या सोबत प्रवाशांना आरक्षण तिकीट दिले जात आहे. परंतु प्रवास करीत असताना रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर प्रवाशांसाठी असलेले पूर्णा स्थानकावरील प्रसाधन गृह, शौचालय बंद असल्यामुळे पुरूषांसह महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

हे प्रसाधनगृह तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी परभणी जिल्हा कुंभार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पलै यांनी दक्षिण-मध्य रेल्वेचे अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पूर्णा येथे निजामकालिन रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्थानकावरून देशात सगळीकडे मध्य रेल्वेने प्रवास करता येतो. हा प्रवास करीत असताना येथे दर महिन्याला लाखो रुपयांचा महसूल आरक्षणाद्वारे रेल्वेला मिळतो. मागील सहा महिन्यांपासून रेल्वे सुरू झाल्यानंतर मुंबई ते सिकंदराबाद, दिल्ली ते औरंगाबाद या भागातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पूर्णा येथून आरक्षण तिकिटाची सोय करण्यात आली आहे. परंतु तिकीट काढल्यानंतर प्रवाशांना रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी एक तास पूर्णा रेल्वेस्थानकावर थांबावे लागत आहे. पूर्णा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत. मागील अनेक दिवसांपासून प्रसाधन गृह, शौचालय बंद आहे. यासंदर्भात वेळोवेळी मागणी करूनही रेल्वे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केले जात आहे. पूर्णा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ प्रसाधनगृह सुरू करावे, अशी मागणी कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पलै यांनी दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.