सुमित दंडुके/औरंगाबाद : पोलीसांवरील हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामुळे गुन्हेगारांना आणि नागरीकांना पोलीसांचा धाक राहिला आहे की नाही, असाच प्रश्न उपस्थित होतोय. काल रात्री चक्क वाहतूक पोलीसांच्याच अंगावर एका ट्रक चालकाने ट्रक घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
क्रांती चौकातून बाबा पेट्रोल पंपकडे रात्री दहाच्या सुमारास एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. ट्रक चालक दारु पिल्याच्या संशयावरुन एका दुचाकीस्वाराने जिल्हा सत्र न्यायालयामोर ट्रक चालकाला ट्रक बाजूला घेण्याची विनंती केली. पाठोपाठ वाहतूक पोलीस देखील आले, पोलीस कारवाईला आल्याचे दिसताच ट्रक चालकाने पोलीसांसोबत अरेरावी केली आणि पोलीसांच्याच अंगावर ट्रक घालत पळ काढला. प्रसंगावधान राखत पोलीस बाजूला झाल्याने पुढील अनर्थ टळला. नंतर पोलीसांनी ट्रकचा पाठलाग केला होता.
शहरात अश्या घटना नेहमीच होत असल्याने पोलीसांचा वचक राहिला नसल्याचे दिसत आहे.