मुंबई: राज्यातील शाळा आता लवकरच सुरू होणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 9 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळेची घंटा लवकरच वाजणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिक्षण विभागाची बैठक घेतली असता बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ ते ८ वीच्या शाळा २७ जानेवारी पासुन सुरु होतील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोरोनाविषयक आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिल्या आहेत.
शाळेची घंटा वाजणार
५ ते ८ वीच्या शाळा २७ जानेवारी पासुन सुरु होतील - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Loading...