नऊ शेळ्यांचा अचानक मृत्यू, चर्चेला उधान

शेळ्या या अचानक दगावल्याने अनेक चर्चेला उधान

नऊ शेळ्यांचा अचानक मृत्यू, चर्चेला उधान

माधव पिटले/ निलंगा : तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील मधुकर उत्तमराव बेळंबे या शेतकऱ्याच्या ९ शेळ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.यात त्यांचे १ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. दि. १५ रोजी आपल्या शेत शेजारी शेळ्या चारत असताना अचानक शेळ्या मृत्यूमुखी पडल्या.बर्ड फ्लूची असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या शेळ्या या अचानक दगावल्याने अनेक चर्चेला उधान आले आहे. नेमके शेळ्या कशाने दगावल्या हे मात्र समजू शकले नाही.

सदरील शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पालन पोषन करून या शेळ्या जगवल्या होत्या परंतु अचानक या ९ शेळ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रूपयांचे नुकसान झाले असून तहसिलदार गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

या घटने बाबत तात्काळ वंचित बहूजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांनी निलंग्याचे तहसिलदार गणेश जाधव यांना माहिती दिली असता त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या कामात असलेले तलाठी अनिल पुरी यांना पंचनामा करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.