माधव पिटले/ निलंगा : अज्ञात चोरट्याने मोटारसायकलची डिक्की फोडून २ लाख लंपास केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बुलढाणा अर्बन बँंकेसमोर सेवा निवृत शिक्षक मोहन चवनहिप्परगे राहणार तळीखेड यांची मोटारसायकल क्रमांक एम.एच.२४ ए.एम.७०४८ उभी केली असता आज दुपारी १२.३० वाजता चोरट्याने लक्ष ठेवून डिक्की फोडुन त्यातील २ लाख रूपये अज्ञात चोरट्याने लंपास केले असून याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पंधरा दिवसातील ही तिसरी घटना आहे. अमरावतीवरून उधारी वसूलीसाठी आलेले कपड्याच्या व्यापाऱ्याची कारमधून दिवसा ढवळ्या बॕग पळविली तर शहरातीलच एका पीग्मी एज्टंला लुटल्याची घटना ताजी असतानाच एका सेवानिवृत शिक्षकाच्या मोटारसायकलची डिक्की फोडून २ लाख रूपये लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाहेरून आलेली चोरांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. निलंग्याचे पोलिस मात्र हतबल झाले आहे. तीन घटना घडूनही व सीसीटीव्ही कॕमे-यात चोरी करणारे कैद होऊनही सुगावा लागत नाही. यावर संशय व्यक्त केला जात आहे.