विद्यापीठात लागली आग

शार्ट सर्किटमुळे कृषी विद्यापीठात लागली आग

विद्यापीठात लागली आग

विजय कुलकर्णी/परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील एका बैठक हॉलमधील शॉटसर्कीटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना सकाळच्या सुमारास घडली असून अग्नीशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले. लागलेल्या आगीत एसीसह खुर्च्या व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे.

Adverties

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास कुलगुरूंच्या कॅबीनच्या बाजूस असलेल्या एका हॉलमधून अचानक धूर निघू लागला. तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी - कर्मचार्‍यांनी तातडीने ही बाब अग्नीशमन दलास कळवली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे अधिकारी दीपक कानोडे, फायरमॅन डी.यू. राठोड, मदन जाधव, मदतनीस गणेश गायकवाड, वाहनचालक एस.के. मौलाना, जलील अहेमद खान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आग विझवली. या घटनेत हॉलमधील एसीसह खुर्च्या जळून नुकसान झाले. यावेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.