आठवडी बाजार राहणार १५ मार्चपर्यत बंद

जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी काढले आदेश

आठवडी बाजार राहणार १५ मार्चपर्यत बंद

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दिला आहे.

कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याने गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरताना नागरिक सुरक्षित सामाजिक अंतराचे पालन न करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, तोंडावर मास्क न लावता संचार करित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात करोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबती निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवावेत, असे आदेश बजावले आहेत. महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आदींनी या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी त्यांच्यावर याबाबत जबाबदारी राहणार असल्याचेही आदेशात मुगळीकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आदेशाचे पालन न करणऱ्याविरूध्द कारवाई करण्यात येईल, असाही इशारा जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आदेशात दिला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.