अक्का फांऊडेशनने फुलविला अनाथ मैनाबाईचा संसार...!

अक्का फांऊडेशनने सामाजिक बांधिलकी जपली

अक्का फांऊडेशनने फुलविला अनाथ मैनाबाईचा संसार...!

देवणी : - अठराविश्व दरिद्रयाचा सामना करत जगणाऱ्या जवळगा (ता. देवणी) येथील रहिवासी अनाथ मैनाबाईच्या जीवनात अक्का फाउंडेशनने आनंद फुलवण्याचा प्रयत्न करून सामाजिक बांधिलकी‌‌जपली.
देवणी तालुक्यातील जवळगा येथील मैनाबाई गोविंद पांचाळ हिची आर्थिक परिस्थिति अतिशय हलाखीची आहे. मैनाचे वडील गेल्या विस वर्षापासून बेपत्ता आहेत, तर आई अंध आहे. मैनाचा सांभाळ तिचे वयोवृद्ध आजोबा करत होते. लग्न चार दिवसावरती येवुन ठेपले होते. यातच नियतीने पांचाळ कुटुंबावर एक आघात केला व मुलीचे आजोबा भिमराव पांचाळ हे मृत्यु पावल्याने दृष्टिहीन आई मैनाच्या नियोजित विवाह कसा होणार? या चिंतेत होती.‌‌याबाबतची माहिती मिळाल्यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रशांत पाटील व सचिन गुणाले यांनी अक्का फाऊंडेशनचे प्रमुख अरविंद पाटील निलंगेकर यांना मैनाची ह्रदयद्रावक कहानी सांगितली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अरविंद पाटील यांनी तात्काळ अक्का फांऊडेशनचे समन्वयक रामलिंग शेरे यांना सुचना करुन संसार उपयोगी साहित्य खरेदी करुन पांचाळ कुटुंबास अन्य आवश्यक ती सर्व मदत देण्यास सांगितले. अक्का फांऊडेशनच्या वतीने या कुंटुबियाना साहित्य देऊन अनाथ मैनाबाई पांचाळ याचा संसार फुलविला...


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.