दोन लाख रुपयांची बॅग हिसकावून चोरटे फरार

गंगाखेड शहरातील घटना, गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दोन लाख रुपयांची बॅग हिसकावून चोरटे फरार

विजय कुलकर्णी/ परभणी : दुकान बंद करून घरी जाणा-या एका व्यापा-यास दमदाटी करीत त्याच्याजवळील १ लाख ९५ हजार रुपये लूटल्याची घटना गंगाखेड येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड येथील वकील कॉलनीत कुणाल अनिल यानपल्लेवार यांचे गायत्री सुपर शॉपी हे दुकान आहे. मंगळवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कुणाल यानपल्लेवार हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी जात होते. दुकानापासून थोडे पुढे गेल्यानंतर असलेल्या चौकातील अंधाराचा फायदा घेत तिघांनी त्यांना थांबवत दमदाटी केली. थापडा मारत त्यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकावुन तिघे जण तेथून फरार झाले. याची माहीती यानपल्लेवार यांनी गंगाखेड पोलिसांना तात्काळ माहिती दिली. पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, फौजदार विठ्ठल घोगरे यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी यानपल्लेवार यांनी गंगाखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, दुकान बंद करून घरी जात असताना तीन व्यक्तींनी आपणास थांबवले. थापडा मारून, दमदाटी करून आपल्या जवळ असलेली १ लाख ९५ हजार रुपये असलेली बॅग घेऊन ते फरार झाले. दोघे स्कुटीवर तर एक जण मोटारसायकलवर आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार विठ्ठल घोगरे हे करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.