औसा : तालुक्यातील शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे मकरसंक्रांती सणाचे औचित्य साधून हळदी-कुंकू व तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वर्धापनदिनी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, सेवानिवृत्ती नंतर मोफत सामाजिक कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या हस्ते पतसंस्थेचे ध्वजारोहण, मोफत दिनदर्शिका वाटप, वार्षिक सभेत जेष्ठ साहित्यीकांचे मार्गदर्शन इत्यादी उपक्रमासोबत महिला शिक्षिकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेतले जातात. पतसंस्थेच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाचे हे ११ वे वर्षे असून पतसंस्थेच्या संचालिका मीराताई कुलकर्णी व उर्मिलाताई सोनटक्के यांनी सर्व शिक्षिका भगिनींना आतापर्यत संस्कार दीप पुस्तके, पेन, रोजनिशी, फुलांचे रोपे, पाणी बॉटल, हॉटपॉट, लंचबॉक्स, भरणी, अप्पल कट्टर, गृहोपयोगी प्लास्टिक झाकण टोपली, फुलांचे रोपे लावण्यासाठी कुंडी इत्यादी वाण लुटला असून यावर्षी पूजेचे पानाच्या स्वरूपाचे स्टील तबक हे वाण लुटण्यासाठी भेट देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे चेअरमन महादेव खिचडे, व्हा.चेअरमन हरीश आयतनबोने, सचिव संजय जगताप, संचालक दीपक डोंगरे, दत्तात्रय दंडगुले, संजय रोडगे, गोवर्धन चपडे, युसुफ पिरजादे, सोमनाथ कांबळे, मधुकर गोरे व कर्मचारी मल्हारी कांबळे, शिरीष पवार, विनय आयतनबोने आदिंनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास २६५ पेक्षा जास्त संख्येने महिला शिक्षिका भगिनी उपस्थित होत्या.