भाजप-काॅंग्रेसमध्ये ट्वीटवाॅर

भाजपने शिवरायांचा अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोप

भाजप-काॅंग्रेसमध्ये ट्वीटवाॅर

मुंबईः शिवजयंती वरून भाजपने काॅंग्रेस वर छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास टाकल्याच दावा केला. यावर प्रतिउत्तर काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले.

काँग्रेसचे सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. यात शिवरायांची कन्या सकवारबाई यांच्याबाबत एक छोटी गोष्ट सांगितली होती. तर, भाजपने या ट्वीटवरुन सचिन सावंत यांना कोंडीत पकडत महाराणी सकवारबाई या शिवरायांच्या पत्नी व सखुबाई या कन्या आहेत, असे म्हणत सचिन सावंत यांच्यावर टीका केली होती.

सचिन सावंत यांनीही भाजपवर प्रतिवार करत इतिहासाचा दाखला दिला आहे. भाजपचा तोंड फोडणारा हा पुरावा पाहा. सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या व एका पत्नीचे नाव ही तेच होते. भाजपने शिवरायांचा अपमान केला, माझी बदनामी केली. अकलेचे तारे तोडल्याबद्दल भाजपने तात्काळ माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.