५ हजार २८६ जणांचे लसीकरण

दिवसभरात ३३१ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती...

५ हजार २८६ जणांचे लसीकरण

विजय कुलकर्णी/परभणी : जिल्ह्यात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेदरम्यान आजपर्यंत ५ हजार २८६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. याचबरोबर दिवसभरात ३३१ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

यात दिवसभरात सेलू येथे १०, मनपा रूग्णालयात ३८, जिल्हा रूग्णालयात ४३, पूर्णा १३, गंगाखेड ३८, जिंतूर ४४, मानवत ५८, पाथरी ३३ तर सोनपेठ येथे २१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. आजपर्यंत सेलू येथे ८६२, मनपा रूग्णालयात ७८६, जांब येथे ३९७, जिल्हा रूग्णालयात ३०८, पिंगळी येथे ९२, पूर्णा येथे ६३३, गंगाखेड येथे ४६५, जिंतूर येथे ३९३, मानवत येथे ४८४, पाथरी येथे ३२८, पालम येथे ३१८ तर सोनपेठ येथे २२० जणांना कोविडची लस देण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.