मुंबई : राज्याचे कॉबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषय वादग्रसत विधान केले आहे. साधू आणि संत यांच्यातील फरक सांगताना त्यांची जीभ घसरली. साधू आणि संत वेगळे असतात. साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात, असे वादग्रस्त वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे. आपल्या वक्तव्याचा व्हिडीओ वड्डेटीवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
साधू आणि संत यांच्यातील फरक समजावताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, संत वेगळे आणि साधू वेगळे असतात. साधूंवर अजिबात विश्वास ठेऊ नका. साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत. संत समाजासाठी समर्पित होऊन काम करतात. तर साधू म्हणजे संधी साधवून घेणारे साधू असतात. चावणाऱ्या विषारी विंचूलाही जो वाचवतो ते संत असतात, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
संत वेगळे आणि साधू वेगळे ....
— Office Of Vijay Wadettiwar (@VijaywaOfficial) February 12, 2021
चावणाऱ्या विषारी विंचू ला ही जो वाचवितो तो संत , आणि साधू म्हणजे ? @VijayWadettiwar pic.twitter.com/ng5jzoZM5H
साधूंना नालायक म्हणणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना मंत्री म्हणवून घेताना लाज वाटली पाहिजे. तुम्ही मंत्री झालात म्हणून तुम्हाला साधूंना शिव्या घालण्याचा परवाना मिळालेला नाही. माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की,हिंदू समाजाला हे दिवस दाखवण्याकरता तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात का? तुमचे मंत्रीच जर साधू-संताना शिव्या घालणार असतील तर का साधूंच्या हत्या होणार नाहीत. सोनिया गांधीचा हिंदू धर्म विरोधी अजेंडा राबवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का? असा प्रश्न तुषार भोसले यांनी विचारला. विजय वडेट्टीवार यांनी साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरं जावे लागेल,असा इशाराही त्यांनी दिला.
