ढोबळेवाडीत चर्चा पती-पत्नीच्या विजयाची...!

ढोबळेवाडी-माचरटवाडी ग्राम पंचायतीवर रमेश देशमुख यांनी सलग तीस वर्षापासून सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले.

ढोबळेवाडीत चर्चा पती-पत्नीच्या विजयाची...!

विजय देशमुख/निटूर:ढोबळेवाडी ग्राम पंचायत निवडणूकीत एकाच पैनलमधून दणदणीत मतांनी विजय मिळवणाऱ्या पती-पत्नीची निटूर परिसरात चर्चा सुरु आहे.
ढोबळेवाडी, माचरटवाडी ग्रूप ग्राम पंचायतीची सार्वञीक निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत रमेश देशमुख व प्रभू चव्हाण यांचे पॅनल शिवाय, या पॅनलच्या विरोधात विरोधकांनीही आणखी एक पॅनल तयार करून मोठे आव्हान उभे केले होते. माञ रमेश देशमुख यांच्या पॅनलने सत्ता अबाधीत राखत विजय मिळवला.
या निवडणुकीचे विशेष म्हणजे पती व पत्नी कांताबाई चव्हाण तसेच प्रभू चव्हाण हे दोघेही एकाच पॅनलमधून ओबीसी प्रवर्गातून राखीव प्रभागातून भरघोस मतांनी निवडून आले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.
सात सदस्यीय ढोबळेवाडी-माचरटवाडी ग्राम पंचायतीवर रमेश देशमुख यांनी सलग तीस वर्षापासून सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.