ओबीसी समाजाची सहविचार बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

ओबीसी समाजाची सहविचार बैठक

विजय कुलकर्णी/ परभणीः येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीने शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात शनिवारी सहविचार बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचीही चर्चा करण्यात आली.

या बैठकीमध्ये ओबीसीची जनजगणना झाली पाहिजे, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, उच्च शिक्षण्साामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, ओबीसी विद्याथ्र्यांना एस.सी., एस.टी. प्रमाणे १०० टक्के शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये २७ टक्के ओबीसी प्रवर्गातून नियुक्ती झाली पाहिजे, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा कायदा झाला पाहिजे, नॉन क्रिमिलरची अट रद्द झाली पाहिजे, संविधान विरोधी शक्तींच्या दबावाखाली तयार झालेली बहुजनांना शिक्षणापासून वंचित करणारी शिक्षण निती रद्द झाली पाहिजे, सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण थांबले पाहिजे यासह विविध मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

यात ओबीसीची जातीनिहाय जनगणना व अन्य मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत नानासाहेब राऊत, मुंजाजी गोरे सुरेश भुमरे, रामप्रभू मुंडे, हरिहर वंजे, संजय साडेगावकर, बबन मुळे, डॉ. धर्मराज चव्हाण, राजेश बालटकर, कीर्तीकुमार बुरांडे, डॉ.सुनील जाधव, डॉ. आनंद इंजेगावकर, विश्वनाथ थोरे, संजय कच्छवे, रामकिशन रौंदळे, अविनाश काळे, अनंत बनसोडे, चंद्रकांत डहाळे, संपत सवणे, लक्ष्मण बुधवंत, स्वप्नील भारती, विश्वनाथ नवघरे, सचिन रासवे, तुळशीराम सुभेदार, कृष्णा कटारे, आप्पा बनसोडे आदींसह ओबीसी समाजातील विविध घटकातील नागरिक सहभागी झाले होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.