सोनपेठमध्ये मतदारांचा धनशक्तीला कौल

निवडणुकीत कोट्यावधींची उधळण ; मतदार झाले मलामाल!

सोनपेठमध्ये मतदारांचा धनशक्तीला कौल

सिद्धेश्वर गिरी /सोनपेठ : स्वच्छ व पारदर्शक पणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सोनपेठ तालुक्यातील मतदारांनी धनशक्ती लाच कौल दिल्याचे चित्र गावागावात पाहावयास मिळाले. या निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी प्रती मतदारांना १००० ते ५००० रुपयांची मेजवानी मिळाली असल्याचे बोलली जाते. यामुळे जनशक्ती ची हार तर धनशक्ती चा विजय झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की, प्रत्येक गावांमध्ये उमेदवाराकडून होणारी पैशांची उधळण, निवडणुकीवरुन होणारे हेवे-देवे, वाद, गटतट, हाणामाऱ्या, भांडणे व पुढील ५ वर्षापर्यंत एकमेकासोबत ठेवलेले कायम वैर हे सर्वश्रुत आहे. एकदा एखाद्या व्यक्तीचे ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित झाले की पुढील अनेक वर्ष त्यांचे राज्य हटतच नाही. याला अपवाद एका दुसरी ग्रामपंचायत असते. कारण ५ वर्षांमध्ये संबंधित ग्रामसेवकाला हाताशी धरून सरपंचांनी बोगस काम करण्यावर सपाटा चालविलेला असतो. आशा ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी सदस्यांचे बहुमत असल्यामुळे या बाबीकडे ग्रामस्थांनी कितीही कटाक्षाने पाहिले तरीही काहीच उपयोग होत नाही.

ग्रामसभा ह्या कागदोपत्रीच आटोपल्या जातात व जनशक्ती पेक्षा धनशक्ती ला जवळीक करणाऱ्या मतदारांची संख्या गावागावात जास्तीची आहे. सर्वसामान्य व दारिद्र्यात जीवन जगत असलेल्या नागरिकांना निवडणुकीमध्ये वेळेवर मिळालेल्या पैशाचे महत्व अधिक वाटते व त्याचाच फायदा घेत प्रस्थापितांना सत्ता काबूत ठेवणे सुलभ जाते. त्यामुळे खरा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सर्वसामान्य जनतेचे काय ? सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये बोगस गिरी करून पुढील ५ वर्षे मायापुरी जमवायची व ५ वर्षानंतर च्या ग्रामपंचायतीसाठी लक्ष्मी अस्त्राचा वारेमाप वापर करत पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करायची. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील विकासाला खीळ बसली आहे.आजही तालुक्यातील आणेक गावामध्ये मजबूत रस्ते,पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, उच्च शिक्षण यांचा अभाव आहे. निवडणुकीमध्ये ऐनवेळी मतदारांकडून धनशक्ती चा स्वीकार होत असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर प्रस्थापितांचाच विजय झाल्याचे दिसून आले.एकंदरीत झालेल्या अटीतटीच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धनशक्ती पुढे जनशक्ती हारल्याचे चित्र पाहावयास मिळाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.