पंतप्रधान मोदी केव्हा घेणार लस?

देशाचे पंतप्रधान आणि मंत्री महोदय करोना लसीबद्दल असलेले भ्रम दूर करण्यासाठी लवकरच लस टोचून घेणार

पंतप्रधान मोदी केव्हा घेणार लस?

नवी दिल्लीः देश भरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लस टोचून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार हे अद्याप समजू शकलेले नाही.

लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लस टोचून घेणार आहे. याच टप्प्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचेही लसीकरण होणार आहे. सामान्य लोकांमध्ये लसीबाबत विश्वास आणि जनजागृती पसरवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासहीत मुख्यमंत्री आणि इतर नेतेही करोना लस टोचून घेणार आहेत.

लसीकरण मोहिमेची सुरुवात करताना मोदी म्हणाले होते की, दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाईल. यानुसार पंतप्रधान मोदीही लस घेणार आहे. मोदींसह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेते ही लस घेणार आहेत.

लसीबद्दल असलेले भ्रम दूर करून लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्तापर्यंत देशात एकूण ७ लाख ८६ हजार ८४२ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. बुधवारी १ लाख १२ हजार ००७ जणांना लस देण्यात आली. सर्वाधिक म्हणजे ३६ हजार २११ आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्नाटकात लस देण्यात आली आहे. त्यानंतर आंध्रप्रदेशात २२ हजार ५४८ तर महाराष्ट्रात १६ हजार २६१ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.