माधव पिटले/ निलंगा : पंतप्रधान अवास योजनेच्या घरकुलचे बिल काढण्यासाठी २ हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने धाड टाकत ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील अंबुलगा (बु) येथील ग्रामसेवक वैजनाथ चाञे यांनी राम वामन बिरादार यांच्याकडून पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे बिल आदा करण्यासाठी २ हजाराची लाच मागितली व ती देताना लातूर येथील लाचलुचपत विभागाने गावच्या ग्रामपंचायत मध्ये रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. यामुळे निलंगा पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. सदरील प्रकरणात औराद शा.पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सुधीर सुर्यवंशी करत आहेत.
सदरील लाच ही प्रत्यक्ष ग्रामसेवकाने न स्वीकारता ती ग्रामपंचायत शिपाई यानी घेतली असल्याचे ग्रामसेवक वैजनाथ चाञे यानी सांगितले सदरील रक्कम ही मी हातात घेतली नाही आणि माझा या व्यवहाराशी काहीच संबंध नाही असे ग्रामसेवक वैजनाथ चाञे यांनी फोनवर माहिती दिली.