फोटो का काढला म्हणून वाळू माफीयाने केली मारहाण

औराद शा.पोलिस ठाण्यात तक्रार दाखल...

फोटो का काढला म्हणून वाळू माफीयाने केली मारहाण

माधव पिटले/ निलंगा : तालुक्यातील औराद शा. येथे आज सकाळी मंडळ अधिकारी यांनी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर शिवाजी चौकात थांबवून चौकशी करत होते. संबंधित ट्रॕक्टरची माहिती लिहून घेत असताना त्याच गावातील एक व्यक्ती सदरील ठिकाणी थांबला होता. त्यास फोटो काढल्याचा संशय धरून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त, शिवाजी चौकात वाळूने भरलेले ट्रॕक्टर अडवून मंडळ अधिकारी सोनकांबळे चौकशी करत होते. त्यातच लोकांची गर्दी जमा झालेली पाहून तेथील बालाजी श्रीमंगले नावाचे एक दुकानदार आपल्या दुकानातून बाहेर येऊन ही गर्दी कश्याची आहे हे पाहत आसताना फोटो काढल्याचा संशय घेऊन जावेद मुल्ला, पाशा गुत्तेदार, मकदुम गुत्तेदार व त्यांचे सात साथीदार सर्व राहणार औराद शा. यांनी मारहाण करून मोबाईल फोडल्याची तक्रार दिली आहे.

औराद शा. येथील शिवाजी महाराज चौकामध्ये वाळू वाहतूकीची माहीती घेत असताना मंडळ अधिकारी यांनी ट्रॅक्टर अडवलेले होते. आणि बघ्यांची गर्दी वाढत होती व अचानक संबंधित अवैधरित्या वाळुविक्री करणारे जावेद मुल्ला व त्याचे काही साथीदार यांनी बालाजी श्रीमंगले यांनी या थांबवलेल्या ट्रॅक्टर चे फोटो काढल्याचा संशय घेऊन त्याचा मोबाईल फोडून त्याला मारहाण केली व पुन्हा असा प्रकार केला तर जीवे मारण्याची धमकी दिली औरादमध्ये कर्नाटकातून येऊन अवैधपणे वाळू व्यवसाय करणारे जावेद मुल्ला यांच्यावर व त्यांच्या साथीदारांवर पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी असा तक्रारी अर्ज बालाजी श्रीमंगले यांनी पोलीसात दिला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या मुजोर अवैध वाळू माफियावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही जावेद मुल्ला यांच्यावर अवैध वाळू प्रकरणातून मारहाणीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. एका मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्नही यापूर्वी झाला होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.