नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आझाद यांच्या सदस्यत्वाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले होते. आझाद हे आपले चांगले मित्र असल्याचं सांगत मोदींनी त्यांची प्रशंसा केली. मोदींना भाषणाच्या दरम्यान अश्रूही अनावर झाले होते. मोदींनी आझाद यांची जोरदार प्रशंसा केल्यानं ते लवकर काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती.
**तर त्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करेल.. **
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतमध्ये आझाद यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘ज्या दिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्या दिवशी मी भाजपात प्रवेश करेन असं स्पष्ट केलं आहे. भाजपचं काय मी त्या दिवशी कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करेन.’ असं आझाद यांनी यावेळी सांगितलं. याप्रकारचे आरोप करणारी मंडळी मला ओळखत नाहीत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.