दिल्ली: देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत सादर केला. यात त्यांनी मोबाईल वरील कस्टम ड्युटी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा केली. आता 2.5 टक्यापर्यत मोबाईल उपकरणांवर कस्टम ड्युटी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामळे आता मोबाईलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मोबाईल उपकरणांवर आता कस्टम ड्युटी 2.5 टक्यांनी लागू केली जाणार आहे. त्यामुळे चार्जर , केबलसह मोबाईलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रानिक वस्तूंच्या ही किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.