पुन्हा होणार का नोटबंदी ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच ५, १०आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार करण्याची शक्यता असल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. परंतु आता सरकारने याबाबत स्पष्टीकरण देत सत्य समोर मांडले आहे.

पुन्हा होणार का नोटबंदी ?

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याचे वृत्त व्हायरल होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्चनंतर सर्व जुन्या नोटा चलनातून हद्दपार करणार असा दावा करण्यात आला होता. परंतु पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हे वृत्त फेक असल्याचे समोर आले आहे. पीआयबी फॅक्टने ट्वीट करुन म्हटले आहे की, हा दावा फेक आहे. आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही स्पष्ट केले आहे की, ५, १०,आणि १०० रुपयांच्या सर्व जुन्या नोटा वैध असून त्या चलनात कायम राहतील. या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा सध्या कोणताही विचार नाही.

पीआयबी ने आपल्या ट्विटर हॅण्डलवर याची माहिती देताना ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की एका वृत्तात दावा केला जात आहे की, आरबीआयच्या माहितीनुसार मार्च २०२१ नंतर ५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार होणार. पीआयबी हा दावा खोटा आहे. आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

पीआयबी - सरकारी वृत्त यंत्रणा
पीआयबी ही भारत सरकाराची धोरणे, विविध उपक्रम तसंच कामगिरीबाबत वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांना माहिती पुरवणारी प्रमुख एजन्सी आहे. पीआयबीने म्हटले आहे की, "कोरोना संकटाच्या काळातच नाही तर देशात जेव्हा परिस्थिती बिघडते त्यावेळी फेक न्यूज सोशल मीडियामध्ये व्हायरल होतात. त्यामुळे सोशल मीडियावरुन आलेल्या माहितीची शाहनिशा करुनच त्यावर विश्वास ठेवा.

भ्रम पसरवणाऱ्या वृत्ताचे इथे तक्रार करा
सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे पाहण्यासाठी PIB Fact Check ची मदत घेतली जाऊ सकते. को संशयास्पद वृत्ताचा स्क्रीनशॉट, ट्वीट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएल कोणीही PIB Fact Check ला ९१८७९९७११२५९ या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवू शकता किंवा pibfactcheck@gmail.com या आडीवर ई-मेल करु शकता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.