माधव पिटले/ निलंगा : तालुक्यातील कासार बालकुंदा येथे गेल्या वर्षी मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत १ कोटी ३१ लाख रुपये खर्च करून पेयजल योजना राबवण्यात आली. दोन पाण्याच्या टाक्या व नवीन पाईप लाईन व गावातील नागरिकांना नवीन कलेक्शन देण्यात आली. परंतु नवीन नळ योजना होऊनही पाणी पुरवठा वेळेवर होत नाही.
पेयजल योजनेसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू निकृष्ट दर्जाची असल्याचे पाहायला मिळत आहे. एक वर्षाच्या आतच गावातील नळयोजनेचे पाईप खराब झालेले आहेत. नळाला सुरुवातीला जो पाण्याचा प्रेशर होता तो आता प्रत्येक घरामध्ये येत नाही. जागोजागी वॉल लिकीज झाल्याने प्रत्येक घराला पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाणी कमी का येते ? विचारणा केली असता पाणी सोडण्याचा वॉल संपूर्ण निकामी झाल्याचे सांगण्यात आले.
पटेल गल्लीला पाणी सोडले तर वॉल लिकिज असल्याने मुल्ला गल्लीला पाणी आपोआप जात आहे. अशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. एका वर्षातच पाणीपुरवठा करणारी वॉल एवढे पैसे खर्च करून खराब झाले आहे. याचे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चौकशी केली पाहिजे अशी मागणी नितीन राजेंद्र आचार्य, बसवराज वीरभद्र कोकणे, संतोष शांतीकर, नायब रानबा भिमराव कावले शिवशंकर बेस्ते, राहुल माधवराव कोडे, रवि बाबुराव कोडे, संतोष आनंत मूळजे, भालचंद्र माणिक मुळजे, सुभाष बाबुराव जायपा राजेंद्र बळवंत मूळजे, संजय शिवानी जयप्पा माणिक दशरथ सारगे, दत्तू प्रकाश सारगे, माधव मुकिंदा या टेकरे, सुनील सुभाष लातूरे, ताजुद्दीन मकबुल पटेल, अनिल मारुती याटेकरे यांच्यासह गावातील नागरिकांच्या सह्या आहेत. गावातील काम विकास अधिकारी राजेंद्र धर्मशेट्टी यांना निवेदन देण्यात आले.
संबंधित निवेदनाच्या प्रती गट विकास अधिकारी निलंगा, जिल्हाधिकारी लातूर, आमदार अभिमन्यु पवार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना देण्यात येणार आहेत.